रुग्णांच्या जीवाशी खेळतोय पाथरी येथील आरोग्य केंद्र

47

 

पाथरी – सावली तालुक्यातील पाथरी हे परिसरातील मध्यवर्ती ठिकाण असून मोठी बाजार पेठ असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. आरोग्याच्या सुविधेसाठी या ठिकाणी आरोग्य वर्धिनी केंद्र असल्याने परिसरातील जनता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आरोग्याची तपासणी करण्यासाठी येतात. परंतु या आरोग्याची व्यवस्था अतिशय ढसाळ असल्याने स्थानिक तथा परिसरातील जनतेमध्ये तीव्र रोष व्यक्त केल्या जात आहे.

या आरोग्य वर्धिनी केंद्रात अनेक जागा रिक्त असून जिल्हा आरोग्य अधिकारी तथा तालुका आरोग्य अधिकारी यांना अनेकदा निवेदना द्वारे मागणी करून सुद्धा जाणूनबुजन या मागणी कडे दुर्लक्ष करीत असल्याने रुग्णाची गैरसोय होत आहे.

 

या आरोग्य वर्धिनी केंद्रात दोन डॉक्टर यांची नियुक्ती केली असली तरी बाह्य रुग्ण तपासणी करिता दोन्ही डॉक्टर गैरहजर राहत असल्याने डॉक्टर विनाच औषधाचे वितरण केल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.

औषध वितरण कर्मचारी यांना विचारणा केली असता बरेचदा डॉक्टर आरोग्य वर्धिनी केंद्रात बाह्य रुग्ण तपासणी च्या वेळी गैरहजर राहत असून फोन द्वारे बाह्य रुग्ण तपासणी करून औषध वितरण करण्याचे सांगत असल्याचे औषध वितरण कर्मचारी यांनी सांगितले त्या मूळे डॉक्टर यांच्या तपासणी शिवाय रुग्णांना औषध दिले जात असल्याने चक्क रुग्णांच्या जीवाशी खेळ खेळत असल्याचा आरोप पाथरी येथील उपसरपंच प्रफुल तुम्मे यांनी केला आहे. या आरोग्य वर्धिनी केंद्रात रिक्त पदे तात्काळ भरून आरोग्याची व्यवस्था सुरळीत न केल्यास आंदोलन व उपोषणाचा इशारा उपसरपंच प्रफुल तुम्मे यांनी दिला आहे.

*प्रतिक्रिया* – पाथरी येथील आरोग्य केंद्रात अनेक पदे रिक्त असून पदे तात्काळ भरण्याची मागणी जिल्हा आरोग्य अधिकारी यांना वारंवार केली असून त्या कडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्या जात आहे. या ठिकाणी दोन डॉक्टरांची नियुक्ती केली असली तरी बाह्यरुग्ण तपासणी करिता अनेकद डॉक्टर गैरहजर राहत असल्याने तपासणी न करताच औषधं वितरण केल्या जात असल्याने रुग्णांच्या जीवाशी खेळल्या जात आहे. या विषयाची विचारणा करण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी यांना फोन केला असता त्यांनी फोन घेतला नाही त्यामुळे या सर्व प्रकाराची चौकशी करण्या करिता वरिष्ठ अधिकारी यांचे कडे तक्रार करणार आहे.
*प्रफुल तुम्मे उपसरपंच ग्रामपंचायत पाथरी*