लोकसहभागातून उभारलं शाळेचं हिरवं सपन,हिरवीगार शाळा अकोला नं.2

57

चंद्रपूर : – ( गांधी बोरकर)
शिक्षक आणि समाज या घटकावर शिक्षणाचे पायाभुत खांब उभे असतात,याची प्रचिती
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अकोला नं 2 येथे शिक्षक व समाज या समन्वयातून साकारण्यात आली.वरोरा तालुक्यातील चारगाव धरण परिसरातील आकोला नं.२ ही चिमुकल्यांची चिमुकली शाळा.दोन शिक्षक येथे प्रामाणिक ज्ञानदानाचे काम करतात.अशा शाळेतील मुख्याध्यापक उमेश आखाडे यांनी आपल्या सहाय्यकांच्या कल्पनेतील हिरवीगार शाळा गावक-यांच्या सहकार्याने स्वप्नागत हिरवीगार केली.जी सर्वांचे मनोवेधक ठरली. लोकसहभागातून फुलली हिरवीगार शाळा, शाळा म्हटलं की तिथे शाळेच्या बोलक्या भिंती रंगरंगोटी परसबाग हे प्रामुख्याने येतातच असा प्रयत्न जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अकोला नं 2 यांनी केला.

लोकसहभागाच्या माध्यमातून शाळेतील विद्यार्थ्यांच्या सहकार्याने विविध फुलझाडे, वेली, मेहंदी, हिरवळ यांची लागवड केली. ते बघून शालेय वातावरण तसेच परिसर प्रसन्न ,प्रशस्त, हिरवळमय झाला आहे.
याचीच दखल घेऊन वरोरा पंचायत समिती प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित 54 वी वार्षिक आमसभा यामध्ये “हिरवीगार शाळा पुरस्कार” देऊन शाळेला गौरवान्वित करण्यात आले. हा शाळेसाठी तसेच गावासाठी निरपेक्ष भावाने केलेल्या केलेल्या कार्याचा सन्मानच.म्हणून सर्वत्र कौतुक होत आहे.

 

या उपक्रमाकरिता शाळेचे सर्व विद्यार्थी ,शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत, बचत गट तसेच गावातील सर्व नागरिक यांनी आपल्या परिश्रमातून हिरवीगार शाळा फुलविली शाळेचे मुख्याध्यापक उमेश शंकर आखाडे, सहाय्यक शिक्षिका कु. हेमलता दयाराम कौरती यांच्या प्रयत्नामुळे लोकसहभागातून शाळेला नवचैतन्य देण्याचे कार्य केले आणि सातत्याने होते आहे . “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या संत ज्ञानेश्वर माऊलीच्या ओळी प्रचिती आणुन देतात.या उक्तीच्या आधारे शाळेत विविध रंगछटा असलेली सुंदर अशी बाग फुलवली आहे .येणाऱ्या जाणाऱ्यांना मोहून टाकेल अशी शाळा निर्माण झाली आहे.
शाळेतील विद्यार्थी नेहमी शाळेत आल्यावर आपलीसी वाटणारी शाळा विद्यार्थी आल्यावर प्रसन्न, उत्साही व ताजेतवाने दिसून येतात. फुललेल्या हिरवळीवर विद्यार्थी गाणी, गोष्टी, बडबड ,गीते आनंदाने गाताना तसेच रममान झालेले दिसून येतात . हिरवीगार शाळा तयार करण्यासाठी श्रीमती बेबी गुणवंत शेडामे यांचे सुद्धा मोलाचे सहकार्य लाभले.

शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नितीन गारगाटे ,उपाध्यक्ष सौ दर्शना रंदई ,ग्रामसेवक मिलीमिले , संजय कुमरे ,अनिल डोये, धनराज भिमटे पोलीस पाटील , सौ शुभांगी गारघाटे , सौ नीता भिमटे ग्रा सदस्य, श्री नत्थू गारगाटे ग्रा सदस्य, शत्रुघ्न रंदई , अशोक भिमटे, संदीप भोगेकर , सौ माया पाटील ,तुकाराम आत्राम यांनी शाळेतील शिक्षकांचे केलेल्या कार्याबद्दल अभिनंदन केले. तसेच गावकऱ्यांचे आभार मानले.