
मी मारवाडी ब्राम्हण हिंदू आहे. पण जेव्हा बुद्ध मालिका मध्ये बुद्धाची भूमिका करण्याची संधी प्राप्त झाली तेव्हा बुद्धाच्या तत्वज्ञानाच्या अभ्यास करण्याची वेळ आली आणि त्यातूनच मला बुद्ध समजला. संपूर्ण विश्वात धर्माचे नावावर मानवा मानवात कलह निर्माण करणे व द्वेष मूलक परिस्थिती निर्माण करून देशाला तोडण्याचे काम जगात असलेले धर्म करीत असल्याचे चित्र मी प्रत्यक्ष अनुभवतो आहे. मी रामायणात काम केले, महाभारत मालिकेत काम केले परंतु विश्वात असा एकच धर्म आहे की जो फक्त मानवाला माणूस म्हणून एकत्रित ठेवणारा सत्यवादी, विज्ञानवादी, शांतीप्रिय धम्म म्हणजेच बौद्ध धम्म होय. म्हणूनच मी बौद्ध धम्माचा स्वीकार केला आणि बौद्ध धम्मच जगाला तारू शकतो असे प्रतिपादन सिनेअभिनेते गगन मलिक यांनी केले.

गगन मलिक फाउंडेशन च्या वतीने चंद्रपुर येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात 75 वे भारतीय स्वतंत्रता अमृत महोत्सवाच्या पर्वावर व्हिएतनाम येथून प्राप्त २२२ अष्टधातू बुद्ध प्रतिमाचे वितरण तथा भव्य सम्मान समारोह आयोजित झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून व्हिएतनाम येथील जगविख्यात पूज्य भिक्खू थीच बिन्ह ताम यांचे हस्ते पार पडले.
तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष गगन मलिक फाउंडेशन चे संस्थापक तथा अभिनेता गगन मलिक होते. सदर कार्यक्रमाची सुरुवात धम्म रेली म्हणून चंद्रपुर येथील दीक्षाभूमी येथे वंदन करून निघाली तर परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला तसेच बॉरीस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या प्रतिमेला पुष्प मालार्पण करून प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृहात विराजमान झाले. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक आणि अध्यक्ष तसेच व्हिएतनाम येथील आलेले ३० भिक्खू संघ यांचे आयोजकाकडून स्वागत समारोह करण्यात आले. यानंतर व्हिएतनाम येथून २२२ अष्टधातू बुद्ध प्रतिमेचे वितरण तथा सम्मान समारोह सामाजिक कार्यकर्त्यांना, पत्रकारांना, सामाजिक चळवळ राबविणारे नेत्यांना व या कार्यक्रमाकरीता अथक परिश्रम घेतलेले कार्यकर्त्यांच्या यावेळी सम्मान करण्यात आला.
तसेच उपस्थित इतर मान्यवरासह अध्यक्ष स्थानावरून गगन मलिक पुढे बोलतांना म्हटले की डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे संपूर्ण भारत बौद्धमय करीन हे अपुरे राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याचे हेतूनेच भारतातूनच या कार्याला सुरुवात करीत असून या करीता देश विदेशातील बौद्ध राष्ट्रांनी मला सहकार्य करण्याचे अभिवचन दिले त्याचाच एक छोटासा प्रयत्न म्हणून हा कार्यक्रम चंद्रपुर येथे करीत आहे.
कार्यक्रमाकरिता नितीन गजभिये, मोहनराव वाकोडे, अनिरुद्ध दुपारे, राजू झोडे, पि. एस. खोब्रागडे, कुणाल घोटेकर, महेंद्र गावंडे, शेखर पाटील, ब्रिजभूषण पाझारे होते. कार्यक्रमाची प्रस्तावना विनयबोधी डोंगरे, संचालन संजय वासनिक तर आभार गोपाल रायपुरे यांनी मानले. संपूर्ण आयोजक अथक परिश्रम घेऊन यशस्वितेने कार्य पार पडले व कार्यक्रमात हजारोच्या संख्येत बौद्धांची उपस्थिती होती.
