ओबीसी लोकांच्या संवैधानिक मागण्यांची अंमलबजावणी करताना सत्ताधारी कुचराई करतात- ऍड.फिरदोस मिर्झा यांचे प्रतिपादन

98

 

नागपूर दि.१७ (प्रति) : ओबीसी लोकांच्या संवैधानिक मागण्यांची अंमलबजावणी करताना सत्ताधारी कुचराई करतात असे स्पष्ट मत राष्ट्रीय ओबीसी वकील महासंघाचे अध्यक्ष अॅड़. फिरदोस मिर्झा यांनी व्यक्त केले. ते राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने आयोजित ओबीसी कार्यकर्ता मेळाव्यात प्रमुख वक्ता म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. बबनराव तायवाडे होते. हा मेळावा खरबी रिंगरोड स्थित श्री गुरुदेव संस्कार भवन येथे आज दुपारी पार पडला.

अॅड़. फिरदोस मिर्झा पुढे म्हणाले की, भारतीय संविधानाने कलम ३४० अन्वये तसेच मुलभूत अधिकारांमध्ये मागासलेल्या ओबीसी लोकांसाठी संवैधानिक आरक्षणाच्या अंमलबजावणीची व्यवस्थित मांडणी व निर्देश दिलेले आहेत. परंतु त्याची अमंलबजावणी करताना केंद्र सरकार असो अथवा भारतातील विविध राज्य सरकारे असो ते कचुराई करतात. मात्र सवर्ण लोकांना न मागताच १० टक्के आरक्षण आरक्षणाची घालून दिलेली ५० टक्के असलेली मर्यादेचा सरळ सरळ भंग करून बहाल करण्यात आली आहे. त्यांनी ओबीसींच्या सर्व मागण्याची कायदेशीर बाजू स्पष्ट करीतआता ओबीसी लोकांनी संघटीत होवून टोकाचा संघर्ष उभा केल्या शिवाय पर्याय नाही, असेही ते म्हणाले.

आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. तायवाडे यांनी ओबीसी लोकांच्या सर्व मागण्या या त्यांना राज्यघटनेने दिलेल्या अधिकारातील आहेत. एकही मागणी ही गैरवाजवी व बेकायदेशीर नाही. परंतु सत्तेत असलेले केंद्र आणि राज्य सरकारे यांची नियतीच ही ओबीसींना आरक्षण न देण्याची आहे. यामुळे बुद्धिमान व मेहनती असलेले ओबीसी लोक हे त्यांचाच हक्कापासून वंचित आहेत, असे मत डॉ. तायवाडे यांनी अनेक दाखले देत व्यक्त केले. यावेळी कास्त्राईब महासंघाचे अध्यक्ष अरु गाडे, , नागपूर ग्रामीण जिल्हा ध्यक्ष राजू चौधरी, नागपूर शहर महिला अध्यक्षा वृंदा ठाकरे, ग्रामीण महिला अध्यक्षा निशा खडसे यांचेही भाषणे झालीत.

यावेळी डॉ. शरयू तायवाडे, डॉ. एन.जी.राऊत, देविदासजी बंड, यशवंत कुथे, भैयाजी रडके, तैनुजा नाखले व प्रवीण राऊत यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

ओबीसी महिला महासंघाच्या अध्यक्षा सुषमा भड यांनी भूमिका तर प्रास्ताविक गुनोश्वर आरीकर यांनी मांडलेले. सूत्र संचालन अॅड़.समीक्षा गणेशे यांनी केले. आभार नागपूर शहर अध्यक्ष राजेश राहाटे यांनी मानले. कार्यक्रमात ऋतिका डफ, विनोद हजारे, संजय मांगे, प्रदीप महाजन,टेमराज माले, रुपेश धोटे यांच्यासह प्रचंड राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते