
सावली तालुक्यातील गेवरा खुर्द येथील महात्मा गांधी तंटा मुक्त समितीच्या अध्यक्षपदी योगेश मुनघाटे यांची एकमताने निवड करणयात आली असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

ग्रामपंचायत कार्यालय गेवरा खुर्द येथे तहकूब ग्रामसभा घेण्यात आली.त्या अनुषंगाने ग्रामपंचायत गेवरा खुर्द येथे मागील तंटामुक्त समितीचे वाचन करून तंटामुक्त समितीचे पुनर्गठन सन 2022-2023 साठी समिती गठीत करण्यात आली.
या तंटामुक्त समितीचे अध्यक्ष म्हणून योगेश महादेव मुंघाटे यांची सलग दुसऱ्यांदा सुद्धा निवड करण्यात आली.तर कार्यकारणी मध्ये सरपंच सौ. उषाताई लक्ष्मण आभारे,उपसरपंच डॉ. गंगाधर माधव धारणे- उपसरपंच
,दिलीप आबाजी कुंभारे- ग्रा.स्व.समिती, डॉ. वासनिक- डॉ. प्रतिनिधी,अनिल देविदास भोयर- व्यापारी प्रतिनिधी,श्रीमती शिल्पा अतुल रत्नावार- बचतगट प्रतिनिधी,चंद्रहास घनश्याम रामटेके- मागास प्रतिनिधी,प्रफुल वामन हुलके- युवक प्रतिनिधी
,सोमनाथ शंकर बाणबले- प्रौढ प्रतिनिधी,सौ. जयश्री खुशाल हुलके- ग्रा.पं. सदस्य,सौ. सुनीता प्रकाश करवाडे- महिला प्रतिनिधी,कैलास मधुकर बाणबले- प्रतिष्ठित नागरिक,मोहूर्ले- लाईनमन, मांदाळे साहेब- बिट अमलदार, नागदेवते साहेब- ग्रामसेवक,भसारकर साहेब – तलाठी,सौ. नलुताई विनायक पोरेड्डीवार- अंगणवाडी सेविका
वरीलप्रमाणे सन 2022-2023 या वर्षसाठी तंटामुक्त समिती गठीत करण्यात आली.या सर्वांचे सर्वत्र अभिनंदन केल्या जात आहे.
