खासदार अशोक नेते यांच्या नेतृत्वात व भाजपा सावली तर्फे रक्तदान शिबिर

51

 

सावली(प्रतिनिधी)
भारतीय जनता पार्टी सावली च्या वतीने स्वामी विवेकानंद काॅन्वेट स्कुल व्याहाड खुर्द येथे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पंधरवाडा सेवा सप्ताह कार्यक्रमाच्या निमित्ताने रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाप्रसंगी खासदार अशोकजी नेते यांनी रक्तदान शिबिरातील रक्तदात्यांना व युवकांना मार्गदर्शन करतांना या
देशाचे यशस्वी पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणासाठी वचनबद्ध आहे.
मा. नरेंद्र मोदीजी देशातील गोर-गरीब, शोषित व वंचित वर्गाच्या कल्याणाकरिता देशसेवेचे ध्येय साध्य करत विविध जनकल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठी समर्पित भावनेने कार्यरत असतात. असे प्रतिपादन या प्रसंगी खासदार अशोक नेते यांनी केले.

याप्रसंगी रक्तदान शिबिराच्या निमित्ताने खा.अशोकजी नेते यांच्या हस्ते महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना,( हेल्थ कार्डचे प्रमाणपत्र) व रक्तदात्यांना प्रमाणपत्र वितरीत करुन फळेसुद्धा वाटप करण्यात आले. तसेच वृक्षारोपण कार्यक्रमसुध्दा करण्याचे ठरविले.

या कार्यक्रम निमित्ताने खा.अशोकजी नेतेयांनी रक्तदात्यांना मार्गदर्शन करुन रक्तदानाचे महत्त्व सांगितले.

या कार्यक्रमा प्रसंगी खा.अशोक नेते गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्र तथा भाजपा राष्ट्रीय महामंत्री अनु.जनजाती मोर्चा,अविनाश पाल तालुकाध्यक्ष भाजपा तथा जिल्हाध्यक्ष ओबीसी मोर्चा,भाजपा तालुका महामंत्री तथा नगरसेवक सतिश बोम्मावार,संतोष तंगडपल्लीवार माजी बांधकाम सभापती,प्रकाश पा.गड्डमवार,अर्जुन भोयर कोषाध्यक्ष,मोहन चन्नावार,योगिता डबले,क्रिष्णा राउत,छायाताई चकबंडलवार,किशोर वाकुडकर,निखिल सुरमवार,जितेश सोनटक्के,कुडावले,दिवाकर गेडाम,तुळसीदास भुरसे सह अनेक भाजपाचे पदाधिकारी व युवा कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी या रक्त दात्यांचा सत्कार करण्यात आला त्यात लखन नापे
आकाश चलाख,वेद कोहळे,उपेन्द्र मगर,मुकेश बिके
,रमेश नाफे,रोशन गावतुरे
,प्राजक्ता गेडाम,रणजित कामटकर, सुखदेव बोधलकर
,विकेश कोरडे,नवनाथ शेटे,राहुल गुरनुले,मनोहर कांबडे,तिरुपती गुरनुले,संदिप बांबोडे,रवि झरकर, प्रदिप कु कुडकार,स्वप्पनिल पाल
अमोल कोठारे यांचा सन्मान करण्यात आला.