वनपरिक्षेत्र राजुरा तर्फे बामणवाडा येथील जी.प. शाळेला ई लर्निंग संच भेट व नलफडी गावात वाचनालयाची निर्मिती

57

राजुरा,प्रतिनिधी
मध्य चांदा वन विभाग, वन परिक्षेत्र राजुरा तर्फे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेअंतर्गत बामनवाडा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेला ई लर्निंग संच सुविधा दिली असून सदर शाळेमध्ये या संचाचे उद्घाटन मुख्य वनसंरक्षक प्रकाश लोणकर यांचे हस्ते पार पडले कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मध्य चांदा वनविभागाचे उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू उपवनसंरक्षक, बामनवाडा येथील सरपंच भारती पाल उपविभागीय अधिकारी अमोल गरकल ,सर्वानंद वाघमारे,वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश येलकेवाड ,सरंक्षण पथक चे वनपरिक्षेत्र अधिकारी अशोक नरखेडकर वनपरिक्षेत्र ,क्षेत्र सहायक प्रकाश मत्ते,संतोष संगमवार ,वनरक्षक देवाजी शेंडे, मुख्याध्यापिका श्रीमती झाडे आदी मान्यवर उपस्थित होते
कार्यक्रमाचे संचालन सहाय्यक शिक्षक नामदेव जाधव यांनी केले याप्रसंगी पालक, ग्रामस्थ तसेच मोठ्या उत्सुकतेने शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते
यावेळी मुख्य वनसंरक्षक प्रकाश लोणकर यांनी सदर विद्यार्थ्यांना संच चालू करून त्यातील चल छायाचित्र व अभ्यासक्रमाबद्दल दाखवून मार्गदर्शन केले.
तसेच नलफडी येथे सुद्धा डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजने अंतर्गत वनपरिक्षेत्र राजुरा कडून वेदिक प्लास्टर चा वापर करून जुन्या समाज भवन इमारती मध्ये दर्जेदार वाचनालयाची निर्मिती केली आहे सदर वाचनालयाचे उद्घाटन मुख्य वनसंरक्षक प्रकाश लोणकर यांच्या हस्ते करण्यात आले केले याप्रसंगी उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू ,उपविभागीय वन अधिकारी अमोल गर्कल उपविभागीय वनअधिकारी सरपंच अमोल टेकाम ,वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश येलकेवाड शिक्षक चापले , प्रथम एज्युकेशन फाउंडेशन चे सदस्य भारती प्रजापती, वन विभाग मार्फत प्रशिक्षण घेऊन आलेले विद्यार्थी, अंबुजा फाउंडेशनच्या प्रतिनिधी कुमारी पायल, क्षेत्र सहायक नरेंद्र देशकर ,वनरक्षक सुलभा उरकुडे वनरक्षक नलफडी व इतर वनकर्मचारी या कार्यक्रमात हजर होते