
वर्धा नदीपूलावर बेपत्ता गंगाधर मोरे यांचा प्रेत आढळून आल्याने खळबळ
*लाठी पोलिसांनी ओडख पटविली*
राजुरा,प्रतिनिधी
राजुरा गोंडपीपरी तालुक्याला जोडणाऱ्या आर्वी गावाजवळील वर्धा नदी पुलावर लटकलेल्या अवस्थेत प्रेत आढळून आल्याने खळबळ उडाली होती परंतु लाठी पोलिसांना याची माहिती मिळताच ठाणेदार मनोहर एम मोगरे,हवालदार सुनील राऊत,पोलीस शिपाई स्वप्नील चव्हाण,प्रवीण आसुटकर ऋषभ कातकर, मोक्यावर येऊन पंचनामा केला त्याचे फोटो सर्व पोलीस ठाण्यात व सोशल मीडियात व्हायरल करण्यात आले
त्यावरून कोरपना तालुक्यातील कढोली येथील त्या मृतकाचे मुलापर्यत याची माहिती मिळाली लगेच घटनास्थळी पोहचून खात्री करून घेतली
मृतकाचे मुलाचे सांगण्यानुसार तीन दिवस अगोदर पासून वडील गंगाधर रामचंद्र मोरे बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसात दिली होती त्यानुसार शोध सुरू होता
पुढील तपास लाठी पोलीस करीत आहेत

