छत्तीसगड वरून येणाऱ्या ट्रॅव्हल्स मधून सुरू आहे गोरखधंदा

91

 

 

छतीसगड राज्यातून चंद्रपूर जिल्यात अवैध रित्या सुगंधीत तंबाखू हा नेहमीच येतो अशी माहिती सावली चे ठाणेदार आशिष बोरकर यांना प्राप्त होताच ते या गाडीच्या मार्गावर होते.आणि त्या गाडीत अवैध तंबाखू असल्याची माहिती मिळताच त्या वाहनाला पकडून 3 आरोपी वर कारवाई करीत 15 लाख 32 हजाराचा मुद्देमाल जप्त केले.पोलीस प्रशासनाच्या या कारवाई ने अवैध विक्रेत्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.

दि.15/09/22 रोजी सायंकाळी 18:30 वा दरम्यान अवैध प्रतिबंधित तंबाखू व गुटखा वाहतुकीबाबत मिळालेल्या गोपनीय माहितीवरून नाकाबंदी केली असता रायपूर ते चंद्रपूर जाणाऱ्या ट्रॅव्हल्स क्रं CG 19F 0833 मधून राजश्री पान मसाला,विमल पानमसाला ,इगल सुगंधित तंबाखू असा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व पानमसाला वाहतूक करतांना मिळून आला.मिळून आलेला प्रतिबंधित तंबाखू व पानमसाला की. अ.32,266 रू व नमूद क्रं ची ट्रॅव्हल्स की.15,00,000 रू असा एकूण 15,32,266 रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

वाहतूक करतांना मिळून आलेला आरोपी तरकेश्र्वर साहू वय 43 वर्ष रा.भेंडीकला जिल्हा राजनांदगाव छ. ग. ( चालक), बिर किशोर सूनानी वय 33 वर्ष रा.रायपूर छ. ग.(कंडक्टर), तुमेश कुमार साहू वय 28 वर्ष रा.सुख्री जिल्हा रायपूर छ. ग. यांचेवर कलम 188,272, 273भादवी सह कलम 59 अ अन्न सुरक्षा मानके अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

 

सदरची कारवाई मा.पोलिस अधीक्षक श्री अरविंद साळवे ,उपविभागीय पोलिस अधिकारी श्री मल्लिकार्जुन इंगळे,ठाणेदार आशिष बोरकर पोलिस स्टेशन सावली यांचे मार्गदर्शनाखाली स.फौ दादाजी बोलिवार,पो.हे.का दर्शन लाटकर,ना.पो.का विशाल दुर्योधन यांनी केली.