आणी….. चोरांनी मारला वाघाच्या पंजावरच हात…वनविभागात खळबळ

169

सावली(सूरज बोम्मावार)
सद्या सर्वत्र मानवावर वन्यप्राणी चे हल्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे तसेच वाघाच्या पंजात अनेकांचा बळी जात असतानाच सावली तालुक्यात मात्र वनविभागाच्या कपाटातील वाघाच्या पंजावर चोरांनी हात मारल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे.

सावली वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या व्याहड खुर्द उपवनक्षेत्र कार्यालयात मध्यरात्री चोरांनी चांगलाच धुमाकूळ घालत तेथील कपाट व इतर साहीत्य अस्ताव्यस्त होते.

रोज प्रमाणे सकाळी सफाई कामगार हा कार्यालय मध्ये गेला असता त्याला कुलूप फोडून दिसले त्यांनी घटनेची माहीती वनपाल यांना दिली त्यानंतर ते घटनास्थळी येवून पाहिले त्यानंतर वरिष्ठांना माहीती देत सावली पोलिसात तक्रार करण्यात आली.

त्यानंतर सदर घटनास्थळी तपास केला असता त्या ठिकाणी कपाटात असलेली सील बंद असलेल्या पेटी मध्ये 2011 च्या कारवाई मधील वाघाचा पंजा,मिशा व नखे व इतर मुद्देमाल जप्त होता.मात्र चोरट्याच्या हातात चक्क वाचा पंजा हा नखा सहित लागल्याने ते घेवून पसार झाले.जप्ती मध्ये असलेला वाघाचा पंजाच चोरीला गेल्याने वनविभाग चे कर्मचारी ही हादरून गेले आहे.

पोलिसांनी घटनेची नोंद घेत तपास चक्रे वेगाने फिरवीत असून घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी इंगळे, सावली चे ठाणेदार आशीष बोरकर यांनी भेट दिली.तपास वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शशिकर चीचघरे हे करीत आहे.