दुःखद बातमी राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयाचे प्राध्यापक डाँ.शिवदास इंदोरकर यांचे निधन

51

 

सावली : स्थानिक राष्ट्रपिता महात्मा गांधी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथील मराठी विभाग प्रमुख डाॅ. शिवदास इंदोरकर यांचे आज दिर्घ आजाराने निधन झाले. ते ५९ वर्षाचे होते. त्यांचे पश्चात पत्नी आणि दोन मूली याशिवाय बराच मोठा परिवार आहे.

सावली तालुक्यातील कन्हाळगांव येथील शिवदास इंदोरकर यांनी अत्यंत गरीबीच्या परिस्थितीत काबाळकष्ट करून उच्च शिक्षण पुर्ण केले. आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आणि महाविद्यालयातील ज्येष्ठ वक्ता प्राध्यापक म्हणून त्यांचा परिचय होता. दि. १५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता सावली येथे त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.