ब्रेकिंग न्यूज…. तालुक्यात वाघाच्या हल्यात शेतकरी जखमी; बैलाचा मृत्यू

139

 

स्वतःच्या मालकीचे जनावर चराईसाठी घेऊन गेलेल्या एका इसमावर वाघाने हल्ला करून जखमी केल्याची घटना सावली वनपरीक्षेत्र येणाऱ्या सामदा बूज क्षेत्रातील सोनापूर बीटात दुपारी ४ वाजता दरम्यान घडली. प्रमोद गणपत मोटघरे वय ३५ वर्ष असे वाघाच्या हल्यात जखमी झालेल्या इसमाच नाव आहे.

सावली तालूक्यातील सोनापूर येथे मोठ्या प्रमाणावर जंगलं व्याप्त परिसर असून वन्यप्राणी हे मोठ्या प्रमाणावर आहे. काल सोनापूर येथील प्रमोद गणपत मोटघरे स्वताच्या मालकीचे जनावर चराई साठी सामदा बीट सोनापूर पेडगाव च्या जवळीस जंगलात नेले होते त्या दरम्यान दबा धरून बसलेल्या वाघाने त्याच्यावर व त्यांच्या बैलावर हल्ला करून सदर इसम हा जखमी झाला.

सदर घटनेची माहिती गावकर्यांना होताच गावकर्यांनी जखमी इसमाल प्राथमिक उपचाराकरिता प्राथमिक आरोग्य केंद्र व्याहाड येथे घेऊन गेले व त्याच्यावर प्राथमिक उपचार करून जखमी इसमास गडचिरोली सामान्य रुग्णालय येथे पाठविण्यात आले सदर घटनास्थळाला वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी भेट देऊन पंचनामा केलेला आहे.

तालुक्यातील वाघ आणि बिबट्याचा हल्याच्या घटनेत दिवंसे दिवस वाढ होत आहे तरी वन विभागाने दखल घेऊन वाघ पळवून लावण्यासाठी काय तरी उपाय योजना कराल अशी मागणी सोनापूर,कापसी, नी.पेडगाव सामदा य ग्रामस्थानी केली आहे.