
बोथली येथील ग्रामपंचायत समोरील रस्त्यावर पडलेली खड्डे दिसताना तंटा मुक्त समिती अध्यक्ष बाळकृष्ण गोरडवार यांनी प्रशाशनाला गावातील रस्त्यावर पडलेल्या खड्यांच्या दुरुस्ती करता तोंडी पाठपुरावा केला पण प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

बोथली येथील प्रवेश द्वार जवळ आणि ग्राम पंचायत जवळ मोट मोठे खड्डे पडलेले आहेत त्या मध्ये पावसाचे पाणी साचून राहिल्याने अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येणारनाहीर डांबराचा थर उखडून गेला असून आता त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे.
नागरिकांना टू व्हिलर चालवणे अवघड बनले आहे. गावातील दोन्ही मुख्य ठिकाण आहेत त्यामुळे प्रशासनाने त्वरित लक्ष घालून अपघात टाळण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी तंटा मुक्त समिती अध्यक्ष बाळकृष्ण गोरडवार यांनी केली आहे.
