
गडचिरोली वरून विरखल मार्गे सिंदेवाही ही बस सेवा पुर्वरत सुरू करावी अशी मागणी युवक कांग्रेस चे जिल्हा महासचिव कुणाल पेंदोरकर यांनी केली तसे निवेदन विभागीय परिवहन अधिकारी यांना दिले त्यांनी 15 दिवसात सुरू करण्याचे आश्वासन दिले.

विरखल गावात इतिहासात पहिल्यांदा कुणाल पेंदोरकर यांच्या प्रयत्नाने लालपरी आली. परंतु कोविड मुळे ती बंद झाली पुन्हा नागरिकांच्या सेवेत लालपरी विरखल पाथरी मार्गे सिंदेवाही सुरू करावी अशी ग्रामस्थांची मागणी होती ती मागणी लक्षात घेवून युवा नेते कुणाल पेंदोरकर यांच्या नेतृत्वात विभागीय वाहतूक परिवहन अधिकारी वाडीभस्मे यांना निवेदन देण्यात आले.
त्यावेळी डेपो मॅनेजर पांडे, कांग्रेस चे कार्यकर्ते किशोर घोटेकर, विश्वनाथ तलांडे, तौफिक शेख, साई सिल्लमवार, वैभव भोयर, बाळकृष्ण कंनाके, गोपीनाथ रामटेके उपस्थित होते.