
७५ व्या भारतीय स्वतंत्रता अमृत महोत्सवाच्या पर्वावर व्हिएतनाम येथून प्राप्त २२२ अष्टधातूच्या बुद्ध प्रतिमाचे वितरण तथा भव्य सम्मान सोहळा गगन मलिक फाउंडेशन भारत शाखा चंद्रपूरच्या वतीने दिनांक १४ सप्टेंबर २०२२ रोजी प्रियदर्शनी सांस्कृतिक सभागृह चंद्रपुर येथे आयोजित केला आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गगन मलिक फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष तथा सिनेअभिनेते हे स्वतः राहणार असून कार्यक्रमाचे उद्घाटक जगविख्यात पूज्य भिक्खू थीच बिन्ह ताम व्हिएतनाम आणि त्यांचा ३० भिक्खुचा संघ उपस्थित राहणार आहे. मुख्य अतिथी म्हणून ना. सुधीरभाऊ मूनगंटीवार मंत्री वन व सांस्कृतिक कार्य म.राज्य, बाळूभाऊ उर्फ सुरेश धानोरकर खासदार चंद्रपुर, विजयभाऊ वडेट्टीवार माजी पालकमंत्री चंद्रपुर जिल्हा आमदार ब्रम्हपुरी, आमदार किशोरभाऊ जोरगेवार चंद्रपुर विधानसभा, आमदार प्रतिभाताई धानोरकर वरोरा, नरेशबाबू पुगलिया माजी खासदार चंद्रपुर,अजय गुल्हाने जिल्हाधिकारी चंद्रपुर, अरविंद साळवे पोलीस अधीक्षक चंद्रपुर, सिद्धार्थ हत्ती अंबिरे, श्रीनिवास गोमासे, राजू झोडे,प्रविण खोब्रागडे, नितीनजी गजभिये गगन मलिक फाउंडेशन समन्वयक नागपूर इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
देवानप्रिय चक्रवर्ती प्रियदर्शी सम्राट अशोक द्वारा जम्बूदीप (भारत वर्ष) मध्ये बौद्ध धम्म प्रचार – प्रसार करण्याचे हेतूने ८४००० बौद्ध स्तूप एवम विहाराचे निर्माण कार्य केलेले होते. भारतात बौद्ध धम्माला पुनर्जीवित करण्याचे कार्य बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ आक्टोंबर ला नागपूर येथे तथा १६ ऑक्टोंबर १९५६ ला चंद्रपुर येथे लाखो लोकांना दीक्षा देवून धम्म स्वीकारला आणि संपूर्ण भारत बौद्धमय करीन अशी संकल्पना करून घोषणा केली.
परंतु हि घोषणा पूर्णत्वास नेण्या अगोदरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापारीनिर्वान झाले आणि बाबासाहेबांचे स्वप्न अपुरे राहिले. बाबासाहेबांचे अपुरे राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याचा छोटासा प्रयत्न गगन मलिक फाउंडेशन भारत यांचे द्वारा केला असून प्रथमत ८४००० हजार बुद्धमूर्ती दान समारंभ व चलो बुद्ध की ओर हा संदेश घेऊन भारतभर उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून चंद्रपुर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
तरी सर्व नागरिकांनी शुभ्र वस्त्र धारण करून कार्यक्रमाला बहुसंख्येनी उपस्थित राहावे असे आव्हान आयोजक गोपाल रायपुरे, विनयबोधी डोंगरे, लाजर कांबळे, अनुताई दहेगावकर, इंजि. संजय वासनिक व इतर मंडळींनी केले आहे.
