Home
Homeमहाराष्ट्र१३ सप्टेंबरपासून सावली तालुक्यात कुष्ठरोग व क्षयरोग रुग्ण शोध मोहीम

१३ सप्टेंबरपासून सावली तालुक्यात कुष्ठरोग व क्षयरोग रुग्ण शोध मोहीम

 

सावली(प्रतिनिधी) सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत सावली तालुक्यात १३ ते ३० सप्टेंबर पर्यंतच्या कालावधीत कुष्ठरोग व सक्रिय क्षयरोग रुग्ण शोध मोहीम राबविण्यात येणार आहे.

या मोहिमेत नागरीकांमध्ये कुष्ठरोग व क्षयरोग आजाराबाबत माहिती, लक्षणे व उपचार याबद्दल जनजागृती करण्यात येणार आहे. कुष्ठरोग व क्षयरोग रुग्ण शोधून त्यांच्यावर तातडीने उपचार करणे व या रोगाचा होणारा प्रसार कमी करणे हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट आहे.

कुष्ठरोग व क्षयरोगाची लक्षणे दिसून येताच रुग्णांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन किंवा गृहभेट देण्यासाठी येणाऱ्या आरोग्य सेवकांकडून तपासणी करून उपचार करून घ्यावे, असे आवाहन सावली तालुक्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.धनश्री औगड(मरलावार) यांनी केले आहे.

या शोध मोहिमेत कुष्ठरोग व क्षयरोग आजाराबद्दल माहिती, तपासणी, आरोग्य पथकाद्वारे करण्यात येणार असून या पथकामध्ये आशासेविका, पुरुष स्वयंसेवक घरोघरी जाऊन तपासणी करणार आहे. संशयित आढळून येणाऱ्या रुग्णांचे थुंकी
नमुने प्राथमिक आरोग्य केंद्र पाथरी व सावली ग्रामीण रुग्णालयात तपासणीकरीता
पाठविण्यात येणार आहे. तरी, नागरीकांनी या शोध मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ.
धनश्री औगड(मरलावार)यांनी केले आहे.

S News Network
S News Networkhttps://www.snewsnetwork.com/
राजकीय । आरोग्य व पर्यावरण । शिक्षण । सामाजिक । गुन्हेगारी । आणि सर्व घडामोडी
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

कृपया बातमी कॉपी करू नये । कृपया शेअर करावी, हि विनंती !