13 सप्टेंबर पासुन वरोरा तालुक्यात कुष्ठरोग व क्षयरोग रुग्णाची शोध मोहीम

89

चंद्रपूर : – (गांधी बोरकर )

सार्वजनिक आरोग्य विभागा मार्फत वरोरा तालुक्यात दिनांक 13 ते 30 सप्टेंबर पर्यंतच्या कालावधी त कुष्ठरोग व सक्रिय क्षयरोग रुग्ण शोध मोहीम राबविण्यात येणार आहे.सदर मोहीम तालुक्यातील 4 प्राथमिक आरोग्य केंद्रातील 160 गावे व वरोरा शहरातील काही भाग असा एकूण 152617 लोकसंख्येच्या 34897 घरामध्ये एकूण 14 दिवस यशस्वीपणे राबविण्या करिता एकूण 123 टीम व 24 सुपरवायझरची नियुक्ती करण्यात आली आहे.समाजातील निदान न झालेले कुष्ठरुग्ण लवकरात लवकर शोधून त्यांना त्वरित औषधोपचाराखाली आणणे, नवीन सांसर्गिक रुग्ण शोधून औषधोपचारद्वारे सांसर्गाची साखळी खंडित करून होणारा प्रसार कमी करणे. समाजामध्ये या रोगाविषयी जनजागृती करणे व कुष्ठरोग दुरीकरनाचे ध्येय साध्य करून कुष्ठरोग निर्मूलनाच्या दिशेने वाटचाल करणेमोहिमेद्वारे या दोन्ही रोगाबाबत समाजामध्ये जनजागृती करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. तसेच या मोहिमे दरम्यान सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम राबविण्यात येत असून समाजातील क्षयरोगाचे निदान न झालेल्या संशयीत क्षयरुग्णाचा शोध घेऊन त्यांची थुंकी नमुने, एक्सरे तपासणी करून निदान करणे व त्यांना औषधोपचारा खाली आणणे.तरी कुष्ठरोग व क्षयरोगाची लक्षणें असल्यास गृहभेटी करिता येणाऱ्या पथकातील टीमद्वारे तपासणी करून मोफत औषधोपचार करून घ्यावे असे आवाहन वरोरा तालुक्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बाळू मुंजणकर यांनी केले आहे.सदर कालावधी मध्ये प्रशिक्षीत टीम द्वारे गावातील प्रत्येक घरी भेट देऊन कुटुंबातील सर्व सदस्यांची तपासणी करणार आहे. या मोहिमेत जनतेला वरील आजाराची माहिती, लक्षणें व उपचार बाबत ची माहिती देण्यात येणार आहे.ही मोहीम यशस्वी पणे राबविण्याकरिता सर्व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी व आशा स्वयंसेविका यांचे सहकार्य लाभणार आहे.