आत्ताची ब्रेकींग न्यूज… सावली तालुक्यातील दुसरी घटना…वीज पडून महिला शेतकरी ठार

79

 

सावली पासून 3 किमी अंतरावरील चकपिरंजी येथील महिला शेतकरी मंगला सुधाकर येल्लटीवार रा चकपिरंजी वय 55 वर्ष या आज स्वतःच्या शेतात निंदण चे काम करीत असताना आज सायंकाळी आलेल्या जोरदार विजेच्या कळकळाटी मध्ये या महिलेच्या अंगावर वीज पडली आणि ती शेतात जागीच ठार झाली.

शेतात गेलेली पत्नी अजून आली नाही म्हणून पती सुधाकर हा शेतात गेला असता ती शेतात पडून दिसली.याची माहिती गावकऱ्यांना देण्यात आली.त्यानंतर सावली पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक चीचघरे घटनास्थळी दाखल होवून पंचनामा करून शव विच्छेदन साठी सावली ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आलेले आहे.

आज सावली तालुक्यात दुपार पासून जोरदार पाऊस असून विजेचा कडकडाट होता.त्यात गेवरा येथे एक शेतकरी तर चकपिरंजी येथे महिला शेतकरी विजेने ठार झाली.