
चंद्रपूर-गडचिरोली महामार्गावरून अवैध गो तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळताच सावली पोलिसांनी सापडा रचून गोवंश सह 12:50 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.पोलिसांच्या या कारवाई ने गोवंश तस्करांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.

आज दि.11/09/22 रोजी चे सकाळी अवैध गोवंश वाहतूक बाबत मिळालेल्या माहिती वरून सकाळी 07:30 वा दरम्यान तात्काळ पो.स्टे सावली समोर चंद्रपूर गडचिरोली महामार्गावर नाकाबंदी केली असता CG 04 JB 7649 हा ट्रक एकूण 25 गोवंश जनावरे अवैधरित्या वाहतूक करतांना मिळून आला.
25 गोवंश जनावरे की.अं 2.5 लाख रु ,नमूद क्रमांकाचा ट्रक की.10 लाख रु.एकूण 12.50 लाख रु चा माल जप्त करण्यात आला. पो.स्टे सावली येथे आरोपी बक्षीस सिंग मुक्तार सिंग 42 वर्ष रा. खदूरसाहिब जि करणतारण पंजाब, मोहम्मद आरिश मोहम्मद कुरेशी वय 22 वर्ष रा. बनत ता. जि. शामली उत्तरप्रदेश यांचेवर महा.पशू संरक्षण अधि.,प्राणी छळ प्रति.अधि.,महा.पोलीस अधि. ,मोटर वाहन कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीतांना अटक करण्यात आली आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अरविंद साळवे सा. , उपविभागीय पोलिस अधिकारी मल्लिकार्जुन इंगळे,सावली ठाणेदार आशिष बोरकर यांचे मार्गदर्शनाखाली दर्शन लाटकर,मोहन दासरवार,धिरज पिदूरकर यांनी केली.
