
पाथरी (नितीन अढिया )

आज दिनांक 7/9/2022रोजी पाथरी येथे ग्रामसभा घेण्यात आली त्यात श्री.मा. मारोती झामदेव ठिकरे यांची अध्यक्षपदी तर श्री.मा.कमलेश भाऊ वानखेडे यांची सचिवपदी बिनविरोध निवड करण्यात आली
सरपंच मा.सौ.अनिताताई लोकनाथ ठिकरे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेण्यात आली या ग्रामसभेत मारोती झामदेव ठिकरे यांची तंटामुक्त समिती मध्ये अध्यक्षपदी तर कमलेश वानखेडे यांची सचिवपदी बिनविरोध निवड करण्यात आली. या प्रसंगी ग्रामसेवक टेकाम साहेब,उपसरपंच प्रफुल तूम्मे,ग्रामपंचायत सदस्य,युवा कार्यकर्ते, महिला, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी तंटामुक्त गाव समितीच्या नवनिर्वाचित अध्यक्ष व सचिव पदी निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांनी त्या अभिनंदन केले.