
मी आहे एक साधा कवी
अजय राऊत माझा नाव
सावली तालुक्यातील
आहे कवठी माझा गाव ll१ll

मी एक सामान्य कवी
साहित्य माझी कला
चारोळी, कविता लिहिणे
हेच आवडते मला ll२ll
दररोज कविता लिहणारा
मी एक साधा सुधा कवी
कोणी काही बोलले तरी
कवीच माझी ओळख नवी ll३ll
मी माझ्या मनातले भाव
जगा समोर मांडतो
म्हणून दररोज एक कविता
तुम्ही वाचावं म्हणून लिहितो ll४ll
कविता, चारोळी लेखन
हीच आहे माझी आवड
लिहीत असतो वेगवेगळे
जेव्हा मिळते मला सवड ll५ll
कविता कशी आहे
ताई आणि दादा
चांगली असेल तर सांगा
लिहणार पुन्हा एकदा ll६ll
रचना -अजय दशरथ राऊत
8999661685
