सावलीतील महिला पंधरा दिवसापासून बेपत्ता

50

 

सावली येथील वार्ड क्रमांक 15 मधील सौ. मंगला गिरजाशंकर दुधे वय 45 वर्ष ही महिला गेल्या पंधरा दिवसापासून बेपत्ता झालेली आहे या संदर्भातून सावली पोलिसांना माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे.

सदर महिला घरून निघते वेळी महिलेच्या डोक्यावर टोपी व गाऊन लावून ही महिला निघालेली आहे तसेच उंची 5 फूट व वर्ण सावळा मध्यम बांधा असून सदर महिलेच्या सर्वत्र शोध घेतला असतानाही अद्यापही महिलाही आढळून आलेली नाही तरी ज्यांना कुणाला या वर्ण व्यवस्थेची महिला आढळल्यास त्यांनी दुधे परिवार सोबत तसेच सावली पोलीस स्टेशन सोबत संपर्क साधावा असे आवाहन गिरीजाशंकर दुधे यांनी केले आहे.