Home
Homeमहाराष्ट्रसी आय सी आर च्या गुलाबी बोंडअळी प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना कीटकनाशके वितरण.

सी आय सी आर च्या गुलाबी बोंडअळी प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना कीटकनाशके वितरण.

चंद्रपूर : – (गांधी बोरकर ) केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर (सी आय सी आर)तर्फे 2018 पासून कीटकनाशक प्रतीकार व्यवस्थापन गुलाबी बोंडअळी रणनीतीचा प्रसार सन २०२२-२३ केंद्र शासन पुरस्कृत प्रकल्प चंद्रपूर जिल्हा अंतर्गत वरोरा तालुक्यातील पाच गावांमध्ये राबवण्यात येत आहे शेतकऱ्यांना गुलाबी बोंड अळी विषय विविध माध्यमातून मार्गदर्शन करत आहे.

 

कपाशीतील फुलोरा अवस्थेच्या अगोदर गुलाबी बोंड अळीच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी कामगंध सापळ्यांचा मोठ्याप्रमाणात वापर करून गुलाबी बोंडअळी कशी कमी करता येईल याचा देखील प्रयोग संस्थेचे संचालक डॉ. वाय. जी. प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली हा देखील प्रयोग चालू आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील 50 लाभार्थी शेतकऱ्यांना निमतेल प्रोफेनोफोस आणि फ्लोनिकॅमिड ह्या औषधी गुलाबी बोंड अळीचा व रसशोषक किड व्यवस्थापनासाठी साखरा, तळेगाव, बोर्डा, सागरा आणि जामगाव या गावांमध्ये वाटप करण्यात आले.

शेतावर प्रात्यक्षिके करून दाखवताना दरम्यान कापूस पिकावर फुलकिडे यांचा प्रादुर्भाव आर्थिक नुसकानाची पातळी खाली दिसून आला कापूस संशोधन केंद्र नागपूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ कीटकशास्त्र तसेच जिल्हा प्रकल्प समन्वय (आय.आर.एम.पी.बी. डब्ल्यू )डॉ. चिन्ना बाबू नाईक यांनी शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन निगराणी निरीक्षण करून गुलाबी बोंड अळी व फुलकिडे यांचे व्यवस्थापन कसे करायचे याचे उपाय सांगितले. तसेच गुलाबी बोंडअळी वर ट्रायकोकार्ड्स कश्या स्वरूपात काम करतात याचे प्रात्यक्षिके करून दाखवले. गुलाबी बोंडअळीचे जीवनक्रम प्रत्यक्ष शेतकऱ्यांना दाखविला. त्यानंतर शेतकऱ्यांचे कपाशीवरील शंका अडचणी जाणून घेऊन त्या वरती कसे उपाय कसा उपाय केला पाहिजे याचे सखोल मार्गदर्शन केले. डॉ. प्रभुलिंगा कीटकशास्त्र शास्त्रज्ञ यांनी देखील रसशोषक कीड विषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
प्रकल्प अंतर्गत प्रत्यक्ष भेटी व चर्चासूत्रे व कामगंध सापळे यांच्या माध्यमातून निगराणी करणे व एकात्मिक नियोजन रणनिती अवलंबणे याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली जात आहे. या प्रसंगी अंबुजा सिमेंट फाउंडेशन यांचा सहभाग लाभला. या कार्यक्रम दरम्यान जवळ गावातील शेतकरी उपस्थित होते.

S News Network
S News Networkhttps://www.snewsnetwork.com/
राजकीय । आरोग्य व पर्यावरण । शिक्षण । सामाजिक । गुन्हेगारी । आणि सर्व घडामोडी
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

कृपया बातमी कॉपी करू नये । कृपया शेअर करावी, हि विनंती !