
चंद्रपूर गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावरील चुनारकर पेट्रोल पंपा जवळ भांसी या गावावरून येणाऱ्या दुचाकी क्रमांक MH 34 BT 56 18 या गाडीने व सावली वरून गडचिरोली कडे जाणाऱ्या मिनी मेटॅडोर MH 34 DJ56 10 या दोघांमध्ये जोरदार भिडत झाल्याने यात दुचाकी वरील मुलगा व आई हे गंभीर जखमी झाले असून त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे भरती करण्यात आलेले आहे.

भांसी येथील ललाबाई रवींद्र पिठले व त्यांचा मुलगा हे दोघेही चुनारकर येथील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी जात असतानाच या त्यांच्या वाहनाचा अपघात झाल्याने दोघेजण गंभीर जखमी झालेले आहे.
या मुख्य महामार्गावर ब्रेकर नसल्याने अनेक वाहने हे भरधाव वेगाने जात आहे त्यामुळे अपघाताची मालिका दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे.घटनेची माहिती मिळताच सावली पोलीस घटनास्थळी पोहचले आहे.