Home
Homeमहाराष्ट्रवनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दाखविले माणुसकीचे दर्शन* *रात्री १२ वाजता घेतली...

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दाखविले माणुसकीचे दर्शन* *रात्री १२ वाजता घेतली रानडुकराच्या हल्ल्यात जखमींची भेट;,,*

राजुरा : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधिरभाऊ हे राजुरा येथे (दि. ३) कार्यक्रमासाठी आले होते,दौऱ्यात चुनाळा येथील अजय नथु कार्लेकर या ३० वर्षीय युवकावर शेतात काम करीत असताना रान डुकराने हल्ला केला होता यात तो गंभीर झाला त्याचेवर उपजिल्हा रूग्णालय राजुरा येथे उपचार सुरु आहे. ही माहीती समजताच गडचांदूर येथील सायंकाळाचा कार्यक्रम आटोपून रात्री 12 च्या नंतर राजुरा येथील उपजिल्हा रुग्णालयात जाऊन गंभीर जखमी शेतकऱ्याची भेट घेउन विचारपूस केली
यातून सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी व्यस्त कार्यक्रमात रात्री जाऊन जखमींची घेतलेली भेट हे माणुसकीचे दर्शन दाखविणारे आहे.

यावेळी जखमींची विचारपूस करून रुग्णालयाचे अधिक्षक डॉ.लहू कुळमेथे यांना योग्य उपचार करण्याच्या सुचना दिल्या. व तसेच उपस्थीत असलेले उपविभागीय वन अधिकारी अमोल गर्कल यांना नियमानुसार लवकरात लवकर जास्तीत जास्त आर्थिक मदत करण्याच्या सुचना दिल्या. यावेळेस प्रभारी तहसिलदार अतुल गांगुर्डे, वनपरिक्षेत्राधीकारी सुरेश येल्केवाड, कैलाश कार्लेकर, मत्स्यव्यवसाय संस्थेचे अध्यक्ष उपस्थीत होते.
घटनेचे गांभीर्य गरीब शेतकऱ्याच्या परिस्थितीची जाणीव मनात ठेऊन उशिर झाला असतांना सुद्धा सामान्य एका जखमी नागरिकांची भेट घेणे टाळले असते मात्र असे न करता पुन्हा एकदा सामान्य नागरिकांशी नाळ जुळलेला मंत्री असल्याचे यातून दाखविले आहे. गरिबाप्रती असलेली सदभावना त्यांना स्वस्थ बसू देत नाही रात्री उशिरापर्यंत जखमींची भेट घेऊन माणुसकीचे दर्शन घडवील्या बद्धल नातेवाईक, रुग्णालयातील रुग्ण व उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.

S News Network
S News Networkhttps://www.snewsnetwork.com/
राजकीय । आरोग्य व पर्यावरण । शिक्षण । सामाजिक । गुन्हेगारी । आणि सर्व घडामोडी
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

कृपया बातमी कॉपी करू नये । कृपया शेअर करावी, हि विनंती !