सावली बसस्थानकावर कार ने आटो ला उडविले..२ गंभीर जखमी

143

 

सावली येथील जुन्या बसस्थानकावर आज सायंकाळी 5 च्या दरम्यान एका कार ने उभ्या असलेल्या आटो ला जबर धडक दिल्याने आटो हा दुसऱ्या कार वर जावून धडकली.म्हणजे या अपघात मध्ये 3 वाहनांची नुकसान झाली असून यात दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना सावली येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

 

सावली येथील प्रा. दिवाकर उराडे यांची कार असल्याची माहिती प्राप्त होत असून ती सावलीच्या जुन्या बसस्थानक जवळील सुरज वाढई यांच्या हॉटेल समोर उभ्या असलेल्या आटोला जोरदार धडक दिली.

धडक एवढी जोरदार होती की त्यात काही अंतरावर उभ्या असलेली दुसरे वाहन वर आपटल्याने त्यांचे ही नुकसान झाले.बस ची वाट पाहत असलेल्या लता कोमलवार व एकनाथ शेंडे हे जखमी झाले असून त्यांना नंदू व्यास व मारोती यांनी आटो मध्ये टाकून रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

 

सद्या या भागात मोठी वर्दळ असते मात्र या ठिकाणी अजूनही ट्राफिक पोलीस नसल्याने याठिकाणी वाहने भरधाव वेगाने जात असून याठिकाणी ट्राफिक पोलीस देण्यात यावे अशी मागणी यावेळी अनेक नागरिकानीं केली आहे.