वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे हस्ते लाभार्थ्यांना घरगुती गॅस किटचे वाटप

56


राजुरा,प्रतिनिधी
डाँक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन योजने अंतर्गत पंचाला येथील लाभार्थ्यांना वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे हस्ते घरगुती गॅस किट व वन्यप्राणी संरक्षण झटका मशीनची वाटप करण्यात आले
राजुरा येथे वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा लाडुतूला व सत्कार कार्यक्रम घेण्यात आला या औचित्याने राजुरा वनपरिक्षेत्र अंतर्गत संयुक्त वनव्यवस्थापन समिती पंचाला येथील लाभार्थ्यांना जनवन योजनेनुसार गॅसकीट चे वाटप वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे हस्ते करण्यात आले याप्रसंगी माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर,माजी आमदार संजय धोटे,माजी आमदार सुदर्शन निमकर,उपविभागीय वन अधिकारी अमोल गर्कल,वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश येलकेवाड,विरुरचे वनपरिक्षेत्र अधिकारी देवराव पवार उपस्थित होते,
डाँक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांची प्रतिमा सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना राजुरा वन कार्यालय कडून भेट देण्यात आली वनमंत्र्याचे हस्ते लाभार्थ्यांना घरगुती गॅस किट,तसेच वन्यप्राणिकडून संरक्षण करणारी झटका मशीन चे वाटप करण्यात आले
यावेळी सर्व वनकर्मचारी,पंचाला येथील संयुक्त वन व्यवस्थापनचे पदाधिकारी उपस्थित होते