आत्ताची ब्रेकिंग न्यूज…. वैनगंगा नदीच्या पुलावर दुचाकी चा अपघात;1 गंभीर जखमी

58

 

गडचिरोली वरून चंद्रपूर ला जात असतानाच आज सायंकाळी 6 वाजताच्या दरम्यान वैनगंगा नदीच्या पुलावर दुचाकी व चार चाकी मध्ये जोरदार अपघात झाला.दुचाकी स्वाराचे नियंत्रण हे सुटल्याने त्या दुचाकी स्वाराने चार चाकी वाहनाला धडक दिली.आणि गाडी सह नदी पात्रात पडला असता मात्र नदीच्या कढड्याने तो रस्त्यावर पडला आणि त्याच्या डोक्याला जबर मार लागलेला आहे.


अपघात होताच त्याच घटनास्थळी व्याहाड बूज येथील भाजप नेते तथा पंचायत समितीचे माजी उपसभापती रवींद्र बोलीवार हे गडचिरोली वरून येत असतांनाच त्यांनी त्या गंभीर जखमी ला त्याच चार चाकी वाहनात गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केले.


अपघात मधील गंभीर जखमी हा कोण आहे याची माहिती अद्याप मिळालेली नाही असून जखमी ची प्रकृती चिंताजनक असल्याचे कळते.