
बहुजन समाज पार्टी चंद्रपूर जिल्ह्याच्या वतीने दिनांक 5 सप्टेंबरला चंद्रपूर येथील राजीव गांधी सभागृह,जयंत टॉकीज जवळ दुपारी 12:30 ला मेळाव्याचे आयोजन केलेले आहे.

या मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी खासदार तथा राष्ट्रीय महासचिव डॉ.अशोक सिद्धार्थ हे उपस्थित राहणार आहे.
तर प्रमुख अतिथी म्हणून प्रदेश प्रभारी नितीन सिंग, प्रमोद रैना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ऍड. संदीप ताजणे,महाराष्ट्र प्रदेश प्रभारी ऍड. सुनील डोंगरे, महाराष्ट्र प्रदेश सचिव सुशील वासनिक,चंद्रकांत माझी, नवनाथ नवानंद खंडाळे,बसपा चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष मुकद्दर मेश्राम हे उपस्थित राहणार आहे.
तरी या मेळाव्याला मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे. कार्यक्रम पूर्वी हेमंत शेंडे यांचा प्रबोधनात्मक संगीतमय कार्यक्रम आयोजित केला आहे.
