सावली येथील स्व.कु.काजल मक्केवार कुटुंबीयांचे खा.अशोक नेते यांनी केले सांत्वन व दिली आर्थिक मदत

68

 

सावली येथील अंकुश मक्केवार यांची मुलगी कु.काजल अंकुश मक्केवार वय १३ वर्ष वर्ग पाचवी मध्ये चांदाळा या ठिकाणी शिकत होती.सुट्टीच्या वेळी आपल्या स्वभावी आली असता आसोलामेंढा या प्रकल्प नहराच्या नहरामध्ये पोहतांना अचानक काजलचा भाऊ पाण्यात बुडाल्याने ति भावाचा जीव वाचवण्यासाठी गेली असता पाण्याचा अंदाज न आल्याने तिचा बुडून अंत झाला.

यामध्ये तिच्या भावंडासह पाच मुले होती पण चार मुलांना वाचवण्यात यश आले.पण आपल्या भावाला वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात टाकल्याने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केले.

याबाबतची माहिती मिळताच या क्षेत्राचे गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार अशोक नेते यांनी मृतकाच्या परिवारांची घरी जाऊन भेट घेवून सांत्वन केले व आर्थिक मदत दिली.

तसेच मृतकाच्या कुटुंबीयांना शासनाकडून मिळणारी मदत तात्काळ मिळवण्यासाठी पाठपुरावा करण्यासाठी तातडीने मदत देण्याचे निर्देश खा.अशोक नेते यांनी नायब तहसीलदार यांना सूचना केल्या

याप्रसंगी खासदार अशोक नेते यांच्या सोबत सावली भाजपा तालुकाध्यक्ष अविनाश पाल,भाजपा तालुका महामंत्री तथा नगरसेवक सतीश बोम्मावार,सावली शहराध्यक्ष आशिष कार्लेकर, ठाणेदार आशिष बोरकर , नायब तहसीलदार सागर कामडी, प्रसाद जकुलवार, मयूर गुरनुले,अंकुश मक्केवार,मधुकर मेडपलीवार,संजय मेडपलीवार,पर्वताबाई मक्केवार शांताबाई तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.