दि महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेट सोसायटी लिमिटेड चा ९ वा वर्धापन दिन साजरा नवीन विविध योजनांचे शुभारंभ

69

 

 

सावली येथील दि महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटीव सोसायटी लिमिटेड चंद्रपूर मुख्य कार्यालय सावलीचा नववा वर्धापन दिन सोहळा व वार्षिक सर्व साधारण सभा सावली येथील संस्थेच्या कार्यालयात संपन्न झाली.

 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष चरणदासजी बोम्मावार होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष विलास यासलवार, जय किसान नागरी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पा. गडडमवार,डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक शिक्षण समितीचे अध्यक्ष कांतीलालजी बोरकर,माजी उपसभापती देवराव सावकार मुद्दमवार,भाजपा तालुका महामंत्री तथा नगरसेवक सतीश बोम्मावार, पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष उदय गडकरी,संस्थेचे संचालक अनुराग सुरमवार,प्रफुल चिटनूरवार,प्रकाश आत्राम,सुनील बोमनवार आदिजन मंचावर उपस्थित होते.

 

यावेळी उपस्थित मान्यवरांचे संस्थेच्या वतीने स्वागत करण्यात आले. त्यानंतर गुणवंत कर्मचारी,उत्कृष्ट अभिकर्ता, गुणवंत विद्यार्थी, संचालक व ग्राहकांचे यावेळी सत्कार करण्यात आला.

तसेच संस्थेच्या विविध उपक्रमाच्या नवीन योजनांच्या शुभारंभ करण्यात आला.तसेच वार्षिक अहवाल चे वाचन करण्यात आले.या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्यवस्थापक सुरज बोम्मावार यांनी केले.संचालन योगेश सातरे तर आभार कु. कविता तावाडे यांनी मानले.

यावेळी रवींद्र बोमनवार,रुपेश येनूरवार, गिरीधर मेश्राम,प्रफुल लाटकर,सत्यवान मांदाळे, लोकनाथ भोयर,श्रीकांत बोमनवार,उल्हास डोंगरे,संजीवनी ओबीलवार,असुला गावडे,किरण गावडे, प्रवीण बोरकुटे,अभीजित नवले,कु.आचल मूत्यालवार यांनी अथक परिश्रम घेतले.

यावेळी विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर,सभासद,ग्राहक,पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.