सावली तालुक्यात स्वाईन पल्यू(H1N1) चा रुग्ण आढळला….आरोग्य यंत्रणेत खळबळ

53

 

सावली तालुक्यातील एका रुग्णाला स्वाईन पल्यू(H1N1) ची लागण झाल्याने मोठी खळबळ माजली असून आरोग्य यंत्रणा त्वरित कामाला लागलेली असल्याचे दिसत आहे.

सावली तालुक्यातील पालेबारसा येथे एका व्यक्तीला ताप येत होता.त्याची लक्षणे योग्य वाटत नसल्याने त्याला गडचिरोली जिल्ह्या सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले.त्यानंतर त्याच्या तपासणी अंती अहवाला नंतर त्याला स्वाईन पल्यू(H1N1) लागण झाल्याची माहिती सावली तालुका आरोग्य विभागाला माहिती होताच एकच खळबळ माजली.

 

सावली तालुका आरोग्य अधिकारी डॉ.धनश्री औघड(मारलावार) यांनी या बाबत वरिष्ठांना माहिती देवून घटनास्थळ गाठले.

 

 

पालेबारसा या गावात प्रत्येक घरी तपासणी चे काम हाती घेतले आहे.तसेच नागरिकांनी घाबरून न जाता सहकार्य करावे व आरोग्याची काळजी घ्यावी असेही आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.