Home
Homeमहाराष्ट्रचक्रधर स्वामी अष्टशताब्धी महोत्सव अटगाड टेकडी(चिंचोली) येथे उत्साहात साजरी.

चक्रधर स्वामी अष्टशताब्धी महोत्सव अटगाड टेकडी(चिंचोली) येथे उत्साहात साजरी.

 

 

चंद्रपूर :- ( गांधी बोरकर )

चिमूर तालुक्यातील अटगाड टेकडी(चिंचोली) मंदिराचा जिर्णोद्धार तथा या ठिकाणाला पर्यटन स्थळाचा दर्जा मिळावा अशी सर्वसामान्य नागरिकांची मागणी आहे त्यासाठी भाजपा नेते तथा कृ. उ. बा. स. चिमूर चे माजी सभापती घनश्याम डुकरे यांनी तसे प्रयत्न चालवलेले असल्याचे प्रतिपादन चक्रधर स्वामी अष्टशताब्धी महोत्सव प्रसंगी त्यांनी केले.

भिसीपासून तीन किमी अंतरावरील चिंचोली लगत असलेल्या डोंगरावर, अटगाड टेकडी येथे नुकताच श्री चक्रधर स्वामी अवतार दिनाच्या निमित्ताने आयोजीत कार्यक्रमात घनश्याम डुकरे यांचेसह जयंत गौरकार ताराचंद रामटेके, मनोज डोंगरे, चंद्रशेखर बोरकर,भानुदास धोटे, गोविंदा तिखट, लीलाधर बनसोड,काशिनाथ रामटेके प्रामुख्याने उपस्थित होते .

कार्यक्रमात उपस्थित जयंत गौरकार, ताराचंद रामटेके, मनोज डोंगरे, चंद्रशेखर बोरकर यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना श्री चक्रधर स्वामी यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश मेश्राम यांनी तर आभार कृष्णा बन्सोड यांनी व्यक्त केले.

श्री चक्रधर स्वामी अवतार दिन, जागतीक मराठी दिन, चक्रधर स्वामी अष्टशताब्धी महोत्सव अटगाड टेकडी चिचोलीच्या वतीने मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. चिंचोली येथील धोटे यांच्या घरून रॅलीची सुरवात करून भजन, किर्तनच्या आवाजात रॅली अटगाड टेकडी येथे आली. आरती, पूजा, विडा अवसर करून मार्गदर्शन कार्यक्रमाला सुरवात झाली. मार्गदर्शन संपताच भोजनाची व्यवस्था करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील जनतेनी अथक परिश्रम घेतले.

S News Network
S News Networkhttps://www.snewsnetwork.com/
राजकीय । आरोग्य व पर्यावरण । शिक्षण । सामाजिक । गुन्हेगारी । आणि सर्व घडामोडी
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

कृपया बातमी कॉपी करू नये । कृपया शेअर करावी, हि विनंती !