
सावली : सौरव गोहने

राष्ट्रपिता महात्मा गांधी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सावली येते कला व वाणिज्य विभागाच्यावतीने प्रथम वर्ष प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी दि.२२ ते २४ ऑगस्ट तीन दिवसीय इंडक्शन प्रोग्रम आयोजित करण्यात आला. भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावलीचे कोषाध्यक्ष डॉ. विजयराव शेंडे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन संपन्न झाले.
अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक खोबरागडे उपस्थित होते या तीन दिवसीय इंडक्शन प्रोग्रम मध्ये महाविद्यालयातील विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली. कला आणि वाणिज्य शाखा संधी व आव्हाने या विषयावर प्रा. विनोद बडवाईक ,प्रा. प्रशांत वासाडे यांनी मार्गदर्शन केले. राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमांची माहिती डॉ. दिलीप कामडी, डॉ. रामचंद्र वासेकर यांनी दिली.
शारीरिक शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांची माहिती डॉ.भास्कर सुकारे व अंतबोध बोरकर यांनी दिली. ग्रंथालय विभाग बद्दलची माहिती प्रा. दिलीप सोनटक्के यांनी दिली. विद्यार्थी कल्याण विभागची माहिती डॉ. प्रफुल वैराळे ,महिला तक्रार निवारण समिती याबद्दलची माहिती प्रा. महानंद भाकरे यांनी दिली.
करियर गायडन्स याबद्दल प्राध्यापक विजय सिंग पवार यांनी माहिती दिली तर स्पर्धा परीक्षेतील स्व अनुभवाचे कथन माननीय दिनकर मोहुर्ले यांनी केले. ऍग्रो फोरम याविषयी प्रशांत वासाडे, वार्षिकांक व अभ्यास मंडळ याविषयी डॉ. रामचंद्र वासेकर आणि मेंटरशिप याबद्दल प्रा. सगानंदबागडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महाविद्यालयातील विविध उपक्रमांचा परिचय व विद्यार्थीचा विविध उपक्रमातील सहभाग वाढावा या हेतूने प्रथम वर्ष विद्यार्थ्यांसाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. समारोपीय सत्रामध्ये डॉ.दिवाकर उराडे उपस्थित होते.
