
भारतीय जनता पार्टी सावली शहराच्या वतीने सावली शहरामध्ये दिनांक 27 आगस्ट ला लहान बाळ गोपालांचा तान्हा पोळा उत्सव मोठ्या थाटामाटाने संपन्न झाला.यामध्ये नंदीबैल सजावट स्पर्धा व वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेमध्ये शेकडो लहान बालगोपालांनी आपल्या नंदीबैलाच्या सजावटीसह वेशभूषा मध्ये सहभाग नोंदवाला.

सावली येथील गुजरी चौकात आयोजित तान्हा पोळा यामध्ये नंदीबैल सजावट व वेशभूषा स्पर्धे च्या बक्षीस वितरण समारंभा च्या अध्यक्षस्थानी भाजपा तालुका महामंत्री तथा नगरसेवक सतीश बोम्मावार होते तर प्रमुख अतिथी म्हणून नगरसेविका तथा भाजपा महिला जिल्हा उपाध्यक्ष निलम सुरमवार, माजी नगराध्यक्ष विलास यासलवार, भाजपा जेष्ठ नेते विलास चिंतलवार,भाजपा व्यापारी आघाडी अध्यक्ष सुनील बेजगमवार, नंदकिशोर संतोषवार,केशव लाटेलवार,माजी सभापती कृष्णा राऊत, भाजपा शहराध्यक्ष आशिष कार्लेकर, युवा नेता गौरव संतोषवार,निखिल सुरमवार, राकेश विरमलवार,परीक्षक दिपंकर रायपूरे,सुनीता चलावार उपस्थित होते.
यावेळी नंदीबैल सजावट स्पर्धेत प्रथम पारितोषिक चि. दर्श विपीन सुरमवार यांना २००१/- रुपये रोख देण्यात आले तर द्वितीय पारितोषिक- कुमारी दिग्विजया अमरदीप कोणपत्तीवार यांना १५०१/- रुपये रोख तर तृतीय पारितोषिक चि. हर्ष राकेश दंडमवार व कुमारी रेवा सुबोध यमसनवार यांना विभागून १००१/- रोख देण्यात आले.
वेशभूषा स्पर्धेत प्रथम पारितोषिक – चि.आरुष किशोर आकुलवार ला २००१/रोख तर द्वितीय पारितोषिक-कुमारी आरफा शकील शेख ला १५०१/-रुपये रोख तर तृतीय पारितोषिक कुमारी ऋत्वि साईनाथ पाल ला १००१ रुपये रोख देण्यात आले.
यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन माजी सभापती कृष्णा राऊत यांनी केले तर आभार हरीश जक्कुलवार यांनी मानले.
तान्हा पोळा उत्सव मध्ये स्पर्धा चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी भाजपा शहर अध्यक्ष आशिष कार्लेकर, निखिल सुरमवार,हरिश जक्कुलवार ,इमरान शेख, राहुल लोडेलीवार,आशिष संतोषवार मयूर गुरनुले,अविनाश चलावार यांनी अथक परिश्रम घेतले.