धक्कादायक ब्रेकिंग बातमी… अन पूर्ण घरच जमिनीत 70 फूट खोल गेला….

167

 

जिल्ह्यातील घुग्गुस येथे धक्कादायक प्रकार उजेडात आलाय. कोळसा खाणींचा भाग असलेल्या या गावातील आमराई वार्डात एक उभे घर थेट सत्तर फूट खाली जमिनीत गडप झाले. या गावात सर्वत्र असलेल्या भूमिगत कोळसा खाणीमुळे हा प्रकार झाल्याची चर्चा आहे.

 

गजानन मडावी यांचे राहते घर अचानक हलू लागल्याने घाबरून जात घरातील सदस्य बाहेर पडले. काही क्षणातच अख्खे घर 70 फूट जमिनीत गडप झाल्याने आसपासच्या नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.

सरकारी कोळसा कंपनी वेस्टर्न कोल फील्ड्स लिमिटेडच्या खाणीमुळे या परिसरात अनेकदा घरे पडल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र अशा पद्धतीने एकच घर 70 फूट गडप होण्याची ही धक्कादायक घटना प्रथमच उजेडात आली आहे.

 

घटनास्थळी महसूल- खाण प्रशासन व पोलिसांचे पथक दाखल झाले आहे. सध्या परिसरातील वीज पुरवठा बंद करण्यात आला आहे.