
सावली शहरातील आसोला मेंढा नहरात कपडे धुण्यासाठी गेलेल्या आपल्या आई सोबत इतर ही बालके सोबत असतांना चार बालके नहरात आंघोड करीत होते.मात्र नहरात आपले बहीण व भाऊ बुडत असल्याचे लक्षात येताच तिथे असलेली काजल ने उडी मारली व वाचविण्यासाठी प्रयत्न करीत होते.

मात्र बालके बुडत असल्याचे एकच कल्लोड झाल्याने बाजूला असलेल्या शासकीय धान्य गोडावून मधील मजूर बालू भंडारे यांनी त्वरित त्या नहरात उडी मारली व त्याने 4 जणांना बाहेर काढण्यात यश आले मात्र काजल ही वाहत गेली.
आज सकाळी 10 च्या सुमारास ची ही घटना असून
रोहित अनिल मेडपल्लीवार वर्ग 7
अमित अनिल मेडपल्लीवार वर्ग 5 वा
राहुल अंकुश मक्केवार वर्ग 4 था,
सुश्मिता अंकुश मक्केवार 8 वर्ग यांना बाहेर काढण्यात यश आले असून कु.काजल अंकुश मक्केवार वर्ग 5 वा चांडाळा आश्रम शाळेत आहे ही मुलगी वाहत गेली आहे.तिचा शोध सुरू आहे.
घटनेची माहिती सावली चे ठाणेदार आशिष बोरकर यांना देण्यात आली.त्यांनी लगेच घटनास्थळी धाव घेत आपल्या चमू सह मुलीचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे.बातमी लिहे पर्यंत मुलीचा शोध लागलेला नव्हता.