शेतात डुकरांसाठी लावलेल्या विद्युत तारांना स्पर्श होवून इलेक्ट्रिक दुकानदाराचा मृत्यू

65

 

शेतातील पिकांना डुकराच्या त्रासाने त्रस्त झालेल्या शेतकऱ्याने आपल्या शेतात डुकरांच्या बंदोबस्त करण्यासाठी लावलेल्या झटका विद्युत ला स्पर्श झाल्याने स्वताच त्याला चिपकुन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रात्रीच्या सुमारास चांदली येथे घडली.मृतक प्रमोद चतारे हे असून ते इलेक्ट्रिक चे व्यापारी आहेत.त्यांचे प्रमोद इलेक्ट्रिक हे मूल येथे दुकान आहे.

त्यांच्या सोबती असलेला व्यक्ती हा प्रमोद अजूनही परत आला नाही म्हणून बघायला गेला असता प्रमोद हा बांधावरून घसरून पडला व त्याच्या तोल हा त्याच्या ताराना लागला आणि त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असे दिसले.त्यानंतर याची माहिती सर्वत्र देण्यात आली.घटनेची पोलिसात नोंद करण्यात आली असून पंचनामा सुरू आहे.आणि सावली येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन सुरू आहे.मृतक प्रमोद चतारे च्या मृत्यूने सर्वत्र शोककळा पसरली आहे.