
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील शेगाव येथुन जवळच असलेल्या चारगाव धरण येथे आज दुपारी तीन वाजताच्या सुमारास दोन युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.या घटनेने खळबळ माजली असून दोन युवकांचा मृत्यूने परिसरात शोककळा पसरली आहे.

सविस्तर असे की बाहेर गावी शिकत असल्याने आज पोळ्या निमित्याने कॉलेज ला सुट्ट्या लागल्या असल्याने एन्जॉय म्हणून फिरण्याचा बेत घेऊन सर्व मित्र एकत्र येऊन चारगाव धरण येथे जाण्याचा बेत घेतला व चारगाव धरण इथे आले.
सदर धरणाचे मनमोहक दृश्य पाहून फोटो काढण्यात सुरुवात केली तेव्हा हार्दिक विनायक गुळघाणे रा. शेगाव बू.हा सेल्फी फोटो काढण्या करिता गेला असता पाय स्लीप होऊन पाण्यात पडला. तेव्हा आयुष चीडे राहणार वरोरा हा त्याला वाचविण्या करिता गेला असता तो सुधा पाण्यात पडला.
तेव्हा या दोघाचा मृत्यू झाला. यात हार्दिक विनायक गुळघाने वय १९ वर्ष राहणार शेगाव बू.तर दुसरा आयुष चिडे याचा जागीच मृत्यू झाला.घटनेची माहिती शेगाव पोलीस स्टेशन शेगाव चे ठाणेदार अविनाश मेश्राम यांना देण्यात आली त्यांनी विलंब न करता घटनास्थळी आले व त्या युवकांना बाहेर काढले.
गावातील रामकृष्ण भट यांच्या सहकार्याने नाव्ह व लोखंडी गळ च्या साह्याने दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले.सदर मृतदेह ताब्यात घेऊन शव विच्छेदन करण्या करिता उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे नेण्यात आले.प्रकरणी अधिक तपास ठाणेदार अविनाश मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे पोलीस कर्मचारी तपास करीत आहे.
मृत युवक सोबत त्यांचे मित्र श्वेतम जयस्वाल रा.शेगाव बू., मयूर पारखी रा.वरोरा,आश्रय गोळगोंडे रा.वरोरा हे मित्र तलाव बाहेर असल्याने त्यांचे प्राण वाचले.
