सावली तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी मानव विकास योजने अंतर्गत बसेस पूर्ववत सुरू करण्यात यावे – तालुका काँग्रेस कमिटीची मागणी

62

 

सावली तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आपल्या आजारातून बस फेऱ्या सूरु होत्या. मात्र अचानक बससेवा बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात त्रास होताना दिसून येत आहे. विद्यार्थ्यांला शाळेवर पोहचण्यासाठी अडचण निर्माण होत असल्यामुळे शाळेपासून अलिप्त राहण्याची शक्यता आहे.

सावली तालुक्यात सावली वरून चारगाव, भारपायली, मानकापूर, चकमानकापूर, मेटेगाव ही बस सकाळी १०.०० वाजता व सायंकाळी ०५.०० वाजता सुरू होती. मात्र आपल्या आगारातून सदर बस बंद करण्यात आल्यामुळे विद्यार्थी व प्रवासी यांची गैरसोय होत आहे. सुरू असलेल्या बसेस बंद केल्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष आहे.

त्यासोबतच गडचिरोली येथून सकाळी ०९.३० वाजता गडचिरोली, व्याहाड बूज, सामदा, केरोडा, कोंडेखल, घोडेवाही, सावली या मार्गाने विद्यार्थ्यांसाठी बससेवा सुरू होती. सदर बस ही सायंकाळी ०५.०० वाजता सुद्धा सुरू होती. मात्र अचानक ही बस बंद करण्यात आल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

आजचा विद्यार्थी हा उद्याचा भारताचा उत्तम नागरिक आहे. शिक्षणामुळे मानवाच्या जीवनात आमूलाग्र बदल होतो. डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज यांनी शिक्षणाशिवाय तरनोपाय नाही नाही असे म्हटले. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण नियमित बस सेवा सुरू करण्यात यावी अशी मागणी सावली तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने निवेदनाच्या माध्यमातून आगार व्यवस्थापक गडचिरोली डेपो ला करण्यात आली.

दरम्यान आगर व्यवस्थापक पांडे, वाहतूक निरीक्षक अतुल रामटेके, सहाय्यक वाहतुक निरीक्षक, धाईत यांनी बस सेवा पूर्ववत सुरू करण्यात येईल असे आवश्वासन दिले.

यावेळी सावली तालुका काँग्रेस अध्यक्ष नितीन गोहणे,युवा नेते सुनील बोमनवार व्याहाड बूज उपस्थित होते.