नदी व नाल्या काठावरील शेतीचे त्वरित पंचनामे करून मदत करा-माजी जीप सदस्य मनीषा चिमुरकर यांची मागणी

94

 

 

सावली तालुक्यातील जिबगांव क्षेत्रातील उसेगाव,पेडगाव,सिर्शी, जिबगांव परिसरातील गावात सलग पाचव्यांदा निर्माण झालेल्या महापूर परिस्थितीमुळे नदी,नाल्या काठावरील धान पिकासह इतर पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.या भागाची त्वरित पंचनामे करावी व हवालदिल झालेला शेतकऱ्याला मदत करण्याची मागणी माजी जीप सदस्य मनीषा चिमुरकर यांनी केली आहे.

मागील काही दिवसात घेतलेल्या पावसाने जोरदार हजेरी लावली. गोसेखुर्द धरण 33 व संजय सरोवर धरण 4 दरवाजे उघडल्याने प्रचंड महापूर आलेला होता. त्यामुळे नदीकाठी गावांना पुराचा सामना करावा लागला आहे. उसेगाव.पेडगाव .शिर्सी जिबगांव अशा इतर गावापासून पूर परिस्थिती निर्माण झाली होती.

 

त्यामुळे सर्व परिसरामधील पिके पाण्याखाली गेलेली आहे. याकडे शासन व प्रशासन गांभीर्याने लक्ष देऊन शेत पिकांचा सर्वे करून त्याचे नुकसान भरपाई लवकरात लवकर द्यावे अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य मनिषाताई चिमुरकर यांनी केली आहे. यावेळी मोतीरामजी चिमुरकर, पुरुषोत्तम चुदरी ग्रा.पं.संरपंच जिबगाव, बाळकृष्ण चुदरी, गणपत गेडाम, बापुजी भोयर,आकनुरवार ग्रामसेवक जिबगाव, उमकेश्वर चव्हाण तलाठी व गावातील शेतकरी उपस्थित होते.