वाघाच्या हल्यात मृत पावलेल्या परिवारातील एकाला शासकीय नौकरीत सामाविष्ट करा-मागणी

42

 

सावली वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या हिरापूर येथे पट्टेदार वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या भक्तदास श्रीरंग झरकर या मृतकाच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी व कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नौकरी देण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

या संदर्भात हिरापूर येथील काही ग्रामस्थ सावली वनपरिक्षेत्र अधिकारी यांची भेट घेवून मागणी केली व पट्टेदार वाघाचा बंदोबस्त करण्यात यावा अश्या मागणी चे निवेदन वनपरिक्षेत्र तालुका अधिकारी मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दिले.

यावेळी निवेदन देताना अनिल बोटकावार जिल्हाध्यक्ष अ.भा.मा.स.सं.चंद्रपूर, सुनिल कोरेवार सावली तालुका अध्यक्ष अ.भा. मा. स. सं.सावली,रमेश लाटेलवार तालुका उपाध्यक्ष,विजय गंगासागर चंद्रपूर शहर अध्यक्ष, रोहित आलेवार तालुका कोषाध्यक्ष, सल्लागार समितीचे अध्यक्ष केशव लाटेलवार, रवि झरकर हिरापुर आदी जण उपस्थित होते.