देवटोक येथे शिवमंदिरात श्रावन मास समाप्ती कार्यक्रम संपन्न

42

 

सावली तालुक्यातील देवटोक श्री मुरकुंडेश्वर मंदीर ट्रस्ट च्या वतीने येथील शिव मंदिर मध्ये श्रावण मास सोमवार समाप्ती समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता.

 

श्रावण मास चा शेवटचा सोमवार असल्याने अनेक भक्त आज सकाळ पासून दर्शनासाठी येत होते.यावेळी श्री पुण्यभूमी मुरकुंडेश्वर देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष संत मुरलीधर महाराज यांच्या हस्ते पहाटे मंदिरात पूजेला सुरुवात झाली.त्यानंतर त्या ठिकाणी अभिषेक करण्यात आला.तसेच शेकडो बेल पत्र वाहण्यात आले.यावेळी अनेक जण दर्शन घेतले.

यावेळी या क्षेत्रातील माजी बांधकाम सभापती जिल्हा परिषद चंद्रपूर संतोष तंगडपल्लीवार,देवराव सा मुद्दमवार,सौ मनिषा चिमुरकर माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रपूर, प्रशांत पा. चिटनुरवार, सुनील बोम्मनवार,राकेश दंडमवार सावली, किशोर गडपल्लीवार गडचिरोली, रविंद्र बोमनवार व्याहाड, निखील सुरमवार सावली,देवटोक ट्रस्ट चे सचिव नरेंद्र जक्कुलवार,सुरेंद्र उरकुडे, राकेश गोलेपल्लीवार ग्रा प सदस्य जिबगांव,सतीश बोम्मावार, गुणवंत सुरमवार,मोहन गाडेवार,पिंटू गड्डमवार यांच्या प्रमुख उपस्तीत गोपाळ काला करण्यात आला.व त्यानंतर महाप्रसाद चे वितरण करण्यात आले.त्याचा अनेक भाविकांनी लाभ घेतला.

या कार्यक्रमात ट्रस्ट चे संचालक तसेच शिर्शी व आदी गावातील भावीक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहुन कार्यक्रमाचा समारोप पार पडला.