जागतिक छायाचित्र दिनानिमित्य सावलीत वृक्षारोपण व रुग्णांना फळे वाटप

53

 

 

सावली(प्रतिनिधी)
छायाचित्रकार बहुद्देशीय संस्था चंद्रपूर संलग्नित,
सावली तालुका छायाचित्रकार संघटनेतर्फे जागतिक छायाचित्रकार दिवसाचे औचित्य साधून सावली शहरातील विविध शासकीय कार्यालयात वृक्षारोपण करण्यात आले तर सावली ग्रामीण रुग्णालयात जावून रुग्णांना फळे वाटप करण्यात आले.

पोलीस स्टेशन सावली येथे ठाणेदार आशिष बोरकर यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला. नंतर तहसील कार्यालय येथे नायब तहसीलदार सागर कांबळे यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला.

व त्यानंतर वनपरिक्षेत्र कार्यालयासमोर चौधरी यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला.

 

सावली येथील ग्रामीण रुग्णालयात जावून वैधकीय अधीक्षक यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व रूग्णांना फळे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी संघटनेचे अध्यक्ष धर्मेश रामटेके, प्रवीण द्विवेदी, विजय गोंगले, राजू नागोसे, विनोद भोयर, विनोद बांगरे, विवेक बांबोळे, नितीन कांबळे, गुरुदास गेडाम, आकाश सहारे, मंगेश पाटील, रमेश बावणे, यशवंत येनगंधलवार, मोरेश्वर नागोसे, मुकुंदा गव्हारे राहुल भरडकर, प्रतिक करकाडे, नितीन गंडाटे यांच्या सह तालुक्यातील सर्व सदस्य उपस्थित होते.