
देशाला स्वातंत्र्य मिळवून 75 वर्ष झाली त्यामुळे देशभरात जल्लोष सुरू असून अमृत महोत्सव मोठ्या जल्लोष मध्ये सर्वत्र पार पाडीत असतानाच सावली तहसील कार्यालयाच्या वतीने या निमित्य साप्ताहिक विविध कार्यक्रम आयोजित केले.त्यात सावली येथील रमाबाई आंबेडकर विद्यालय व महाविद्यालयाने अनेक स्पर्धत सहभागी होत विजयी झाले आहे आहे.

रमाबाई आंबेडकर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या तहसील कार्यालय सावली द्वारा घेण्यात आलेल्या तालुका स्तरीय चित्रकला स्पर्धांमध्ये कु. त्रिशा रामटेके हीने प्रथम क्रमांक पटकावला. तर द्वितीय क्रमांक कु. कृतिका चापडे आणि तृतीय क्रमांक कु उन्नती ठाकरे यांनी पटकाविला रांगोळी स्पर्धेत माऊंट कनिष्ठ महाविद्यालय सावली ची विद्यार्थिनी कु किटी शेडमाके हीने प्रथम क्रमांक पटकावला आणि रमाबाई आंबेडकर विद्यालयाची विद्यार्थिनी कु उन्नती ठाकरे हीने द्वितीय क्रमांक पटकावून या रांगोळी कडे सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शिक्षिका सौ.चंदा सुभाष गेडाम व घनश्याम मेश्राम यांच्या मार्गदर्शन मध्ये हे विद्यार्थी स्पर्धत सहभागी झाले होते.
या सर्व विजेत्यांना तहसील कार्यालयात संपन्न झालेल्या कार्यक्रमात माजी पालकमंत्री तथा आमदार विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते सन्मान व पुरस्कार देवून गौरविण्यात आले.यावेळी सर्वांनीच या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.