
सावली तालुक्यातील उसेगाव येथील अंगणवाडी क्र. 1 व 2 मध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

शुक्रवार ला राधाकृष्ण वेशभूषा व गोपाल पंगतिचे आयोजन तसेच माता सभेचे आयोजन करण्यात आले. रक्षाबंधन म्हणून किशोरी मुलींची सभा घेण्यात आली.या ठिकाणी आयोजित विविध स्पर्धेत अनेक जण सहभागी होऊन उत्तम असा प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाला उसेगाव येथील प्राथमिक उप केंद्राच्या CHO कु. प्रगती रामटेके ,सौ.अश्विनी चौधरी, कोकाटे सर मुख्याध्यापक प.उच्च प्राथमिक शाळा ऊसेगाव, सौ चंद्रकला विलास सहारे अंगणवाडी कार्यकर्ती,कू.रुपाली विलास सहारे अंगणवाडी कार्यकर्ती उसेगांव,सौ पिंकी शरद ठुसे मदतनीस ,सौ.कांताबाई परशुराम रामटेके मदतनीस, सौ.सुनीता गिरिधर उरकुडे महिला बचत गट,डियम अरुण पाल युवा कार्यकर्ता उसेगावं, सौ.शिल्पा मेश्राम आदी जण उपस्थित होते.
उपस्थित सर्वांचे अंगणवाडी शिक्षिका चंद्रकला सहारे यांनी आभार मानले.
