स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये झेंडा वंदन व वृक्षारोपण

87

 

सावली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सावली येथील मुख्यालयाच्या खुल्या जागेवर वृक्षारोपण करून एक सामाजिक उपक्रम या संस्थेच्या वतीने राबविण्यात आला.

सर्वप्रथम 15 आगस्ट ला सकाळी 8:25 ला सभापती हिवराज शेरकी यांच्या हस्ते झेंडा वंदन करण्यात आले.त्यानंतर सभागृहात 75 व्या वर्धापन दिन केक कापून साजरा करण्यात आला.यावेळी उपसभापती दिवाकर पा. भांडेकर, सचिव नरेश सुरमवार,संचालक प्रशांत पा. चिटनुरवार, खुशाल लोढे, अंकुश वरगंटीवार, श्रीमती वाढणकार प्रामुख्याने उपस्तीत होते.

 

यावेळी सावली शहरातील अनेक व्यापारी, राजकिय नेते,पदाधिकारी, नगरसेवक, पत्रकार यांनी भेट देत शुभेच्छा दिल्या.उपस्थित सर्वांना नास्ता,चहा,बिस्कीट ची व्यवस्था करण्यात आली.यावेळी संस्थेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.