स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सावलीच्या सखींनी केले वृक्षारोपण

111

 

सावली येथील स्पंदन सखी परिवारचा सुपर वुमेन्स ग्रुपने 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सावली ते बोथली या मुख्य मार्गावर वृक्षारोपण करून एक सामाजिक उपक्रम या संस्थेच्या वतीने राबविण्यात आला.

तसेच सावली शहरातील काही प्रभागातील खुल्या जागेवर सुद्धा या ग्रुपच्या वतीने वृक्षाचे रोपण करण्यात आले.

यावेळी नीलिमा बोमनवार, वैशाली शेंडे ,स्मिता शेंडे ,सोनाली संतोषवार,रूपा राईनचवार, कांचन शेंडे, मनीषा बोमनवार, ममता बोमनवार, सुषमा चिलवे, शिल्पा रक्षमवार, नेहा शेंडे, मंजुषा पोटवार, कोमल संतोषवार, स्नेहल संतोषवार, पिंकी गोजे आदी महिला उपस्थित होत्या.

या सामाजीक ग्रुपच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.त्यांच्या या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.