ब्रम्हपुरीत आढळला दुर्मिळ पट्टेरी मण्यार

165

 

अतिशय दुर्मिळ असलेला पट्टेरी मणियार साप हा ब्रम्हपुरी येथील पेठ वॉर्ड मधील विजय अंबादे यांच्या राहत्या घरी आढळून आले आहे.

चार फूट लांबीचा साप असल्याची माहिती सर्पमित्र गणेश सातरे व सार्थक मेहर यांना देण्यात आली.त्यावरून या दोन्ही सर्प मित्रांनी घटनास्थळी धाव घेत सापाला बघताच हा दुर्मिळ पट्टेरी मणियार असल्याचे लक्षात आले.

 

मोठ्या शिताफीने या सापाला पकडून वनविभागाला माहिती देण्यात आली.

पट्टेरी मणियार या जातीचा साप ब्रम्हपुरीत आढळाल्याच्या फार कमी नोंदी झालेल्या आहेत,हा साप भारतात प्रामुख्याने पश्चिम बंगाल,आसाम ,बिहार व पूर्व महाराष्ट्रातील वैनगंगा नदीकाठच्या भागात आढळून येतो.