
सावली तालुक्यातील नदीकाठच्या हरांबा, कढोली,लोंढोली परिसरातील गावात सलग पाचव्यांदा निर्माण झालेल्या महापूर परिस्थितीमुळे धान पिकास व इतर पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

शेतकरी वर्ग हवालदिल झालेला आहे.तसेच शेतकऱ्यांचे शेती उपयोगी साहित्य पुरामुळे वाहून गेल्याने, हल्ली धान रोवणीसाठी मोठे संकट निर्माण झाले आहे.
मागील काही दिवसात पावसाने जोरदार हजेरी लावली. गोसेखुर्द धरण 33 व संजय सरोवर धरण 4 दरवाजे उघडले असल्याने प्रचंड महापूर आलेला आहे. त्यामुळे नदीकाठी गावांना पुराचा सामना करावा लागत आहे. हरांबा, उमरी, डोनाळा, कठोली, लोढोली, साखरी अशा इतर गावापासून पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे.
त्यामुळे सर्व परिसरामधील पिके पाण्याखाली गेलेले आहेत. याकडे शासन व प्रशासन गांभीर्याने लक्ष देऊन शेत पिकांचा सर्वे करून त्याचे नुकसान भरपाई लवकरात लवकर द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.